Bipasha Basu : बिपाशाचा नववर्षात मुलीसोबत वाढदिवस; आई-लेकीची क्यूट जोडी

Bipasha Basu
Bipasha Basu
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) हिने गेल्या काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. बिपाशा आणि पती करण सिंह ग्रोवरने या मुलीचे नाव 'देवी' असे ठेवले आहे. आता नव्या वर्षाच्या सुरूवातीला बिपाशाने तिची ४४ वा वाढदिवस पहिल्यांदा मुलीसोबत मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. या वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळच्या फोटोत आई- लेकीची क्यूट जाडीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्री बिपाशा बसूचा (Bipasha Basu) ४४ वा वाढदिवसाची पार्टी नुकतीच पार पडली. या पार्टीत बिपाशासोबत मुलगी देवी, पती करण आणि काही मित्रांसोबत खास पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. 'देवी' च्या जन्मानंतर बिपाशाचा हा पहिला वाढदिवस असल्याने मोठ्या उत्साहात पार पडला आहे. यावेळी खास करून बिपाशाने ग्रीन कलरचा शर्ट आणि पॅन्ट परिधान केला होता. या वाढदिवसाचे काही फोटो बिपाशाने तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'Birthday Jig ??Boomerang returns ?'. असे आणि फोटोच्या कॅप्शनमध्ये '3 of Us ❤️ This birthday was soooo different but soooo special ❤️??Thank you everyone for your wonderful wishes and love. Truly grateful ??❤️'. असे लिहिले आहे.

याच दरम्यान पहिल्यांदा बिपाशाने तिच्या मुलगी देवीची झलक दाखविली आहे. यात देवी तिच्या आईच्या कुशीत म्हणजे, बिपाशाच्या पायावर बसलेली दिसतेय. यावेळी खास करून देवीच्या कपड्यावर 'आय लव्ह मॉम' असे लिहिले आहे. मात्र, बिपाशीने देवीचा चेहरा स्पष्ट दाखविलेला नसून तिने तिच्यावर हार्टवाला ईमोजी ठेवला आहे. याशिवाय करण आणि काही मोजक्याच मित्रांसोबतदेखील बिपाशा दिसली आहे. बिपाशाचा आणि देवीचा हा फोटो खूपच व्हायरल होत आहे. दुसऱ्या फोटोत तिघांची जोडी आणि तिसऱ्या फोटो बिपाशा- करण क्यूट कपल पाहायला मिळतेय.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव करत कॉमेन्टस केल्या आहेत. यात बिपाशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. तर काही नेटकऱ्यांना आई- लेकीची क्यूट जोडी पसंतीस उतरली आहे. बिपाशा आणि करणला लग्नानंतर ६ वर्षांनी मुलगी झाली आहे. १२ नोव्हेंबर २०२२ मध्ये बिपाशाने देवीला जन्म दिला. आता देवी दोन महिन्याची झाली आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news