Rinku Rajguru : 'दिस वाटे वेगळा अन् ...'; आर्ची प्रेमात पडली❤️? | पुढारी

Rinku Rajguru : 'दिस वाटे वेगळा अन् ...'; आर्ची प्रेमात पडली❤️?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने ‘सैराट’, मेकअप’, ‘कागर’ आणि बिग बी अमिताभ बच्चनसोबतच्या ‘झुंड’ या गाजलेल्या चित्रपटात अभिनयातून चुणूक दाखविली आहे. सैराट चित्रपटातील तिने साकारलेली ‘आर्ची’ आजही चाहत्याच्या मनात घर करून आहे. तिचे चित्रपटातील सेटवरील असो वा रिअल लाईफमधील फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर पाहायला मिळतायेत. सध्या तिच्या ( Rinku Rajguru ) आणखी एका हटके व्हिडिओनं चाहत्यांना घायाळ केलं आहेत.

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने ( Rinku Rajguru ) तिच्या इन्स्टाग्रामवर मराठमोळ्या लूकमधील व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती लाल रंगाच्या साडीसोबत ब्लॅक रंगाच्या ब्लॉऊजमध्ये एकदम हटके दिसतेय. केसांत गजरा, हातात लाल बांगड्या, कानात झुमके, गळ्यात मोत्याची माळ, कपालावर टिकली, रेड लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. यावेळी रिंकू एका बागेत बसलेली असून लाजताना आणि हासताना खूपच सुंदर दिसत आहे. रिंकू म्हणजे, ‘सैराट’मधली आर्ची पहिल्यांदा हातात लाल बांगड्या घालताना तर नंतर तिच्या नजरेनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Beauty and song perfect ever ❤️’. असे लिहिले आहे.

रिंकूने व्हिडिओच्या बॅकग्रांऊटला ‘दिस वाटे वेगळा अन् लागे का लळा, हे वेडे मन माझे करतेच भानेननन…, सुख कळले कळले सुख कळले कळले कळले ना कसे सुर जुळले….. ‘. असे मराठी गाण्याचे बोल वाजत आहेत. या व्हिडिओवरून आर्ची पुन्हा एकदा कोणाच्या तरी प्रेमात पडल्याचे चाहत्याच्यात बोलले जात आहे. यातील तिचा लाजरापणा सर्व सांगत असल्याचेही एका युजर्सने म्हटलं आहे.

‘Awwww🥺🥺🥺🥺’, ‘Beauty 😍😍’, ‘लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.’, ‘कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लागलं कळचं नाही..’, ‘काय आहे माहिती नाही मला…पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर प्रत्येक जन्मी हवय मला !’, ‘Beautiful 😍😍’, ‘Lay khush… 🥰’, ‘Superb ❤️’, ‘Hastay Kay hasvatay 😂.but beautiful smile madam 💖’, ‘Happy Sunday love you Rinku 🥰’, ‘khup bhari distes 😍😍’, ‘Beauty and the song both are beautiful 😍❤️’, ‘God bless you Rinku be happy 😊’, ‘Pretty 💕🥺’, ‘Awww ky Sundar disat ahe ❤️❤️😘😘’, ‘Very nice 👍’, ‘Awesome fabulous gorgeous ❤️🔥’, ‘Woww khupqch chan 😍❤️’, ‘❤️ mast archi’, ‘Killer look ❤️’, ‘अती सुंदर ❤️’, ‘Outstanding❤️❤️’, ‘Nice ❤️’, ‘Beautiful Rinku didi 😍❤️…. Looking sooo prettyyyyy dear 🤗🥰😘’, ‘So cute 😍’. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या व्हिडिओला आतापर्यत २ तासांत १० हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. याआधीही रिंकूने लाल रंगाच्या ड्रेसमधील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

हेही वाचा :

Back to top button