Amruta Khanvilkar : आत्ता कुठे थंडी सुरु झाली होती परत गरमी वाढली?

Amruta Khanvilkar : आत्ता कुठे थंडी सुरु झाली होती परत गरमी वाढली?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) तिच्या बहुचर्चित 'चंद्रमुखी' चित्रपटामुले चचेर्त आली होती. विशेष म्हणजे तिचे या चित्रपटातील 'चंद्रा' गाणे सुपरहिट ठरले. यानंतर ती 'लुटेरे' ही वेबसीरिज लवकरच घेवून येणार आहे. चंद्रा रिअल लाईफ असो वा छोट्या पदडद्यावरील 'झलक दिखला जा' हा शो असो नवनवीन हॉट लूक शेअर करून चाहत्यांच्या सपंर्कात राहत असते. आतादेखील तिने तिच्या इन्स्टाग्रामवर आणखी काही सुंदर फोटो शेअर केल्याने ती चर्चेत आली आहे. तिचे हे फोटो पाहून तुम्हीदेखील म्हणाल, व्वा क्या बात है.

अभिनेत्री अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) तिच्या इन्स्टाग्रामवर हॉफ शोल्डर टॉप आणि पिंक कलरचा फ्लोअर लेंहग्यातील फोटो शेअर केले आहेत. मोकळ्या केसांची स्टाईल, कानात मोठे झुमके, हातात मोठी अंगठी, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. यातील खास बाब म्हणजे, तिने किलर आणि एकापेक्षा एक हॉट पोझेस् दिल्या आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये '#wintervibes, #decembersun' असे लिहिले आहे.

फोटोंमध्ये अमृताच्या चेहऱ्यावर सूर्यकिरणाचा प्रकाश पडला असून यावेळी तिच्या सौदर्यांत आणखी भर पडली आहे. यात अमृता कधी रस्त्यावर तर कधी एका भितींच्या शेजारी उभारून पोझ देताना दिसलेय. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. याशिवाय अमृताने  सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. तेथील प्रवासाला जातानाचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतो.

Superb ?, Muahhhhhhhh ?, Uffffffff, Too ? to handle ?, Ummmm mast❤️❤️, ❤️❤️Queen of million Heart ❤️❤️, Very nice❤️❤️, Nice looking to hot, Haste khup chan yaar hi, ?Very ?, Gorgeous ❤️❤️, Beautiful pictures ?❤️?❤️, ?Very nice looking ❤️mam, Atta kuthe thandi suru zali hoti…parat Garmi suru zali…so ????, कसले Abs aahet tuze yaar amu??❤️❤️, फुलपाखरू ?❤️❤️, Cute distat tume, आत्ता कुठे थंडी सुरु झाली होती परत गरमी वाढली????. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केलेत. या फोटोंना आतापर्यत जवळपास ३० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news