Nyasa Devgan : न्यासा पडता पडता वाचली | पुढारी

Nyasa Devgan : न्यासा पडता पडता वाचली

अजय देवगण आणि काजोलची लेक न्यासा ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सध्या न्यासाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत ती धडपडताना दिसत आहे. न्यासा मुंबईतील जुहू भागात एका सलूनमधून बाहेर येताना दिसली. यावेळी न्यासाने पिंक कलरचा क्रॉप टॉप आणि यामध्ये न्यासा खूपच सुंदर दिसत होती. ती सलूनमधून बाहेर पडली आणि मोटारीजवळ जायला निघाली, पण गेटमधून बाहेर पडताच तिला ठेच लागली आणि ती पडता पडता वाचली. तिच्या या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट कमेंट्स करत आहेत.

‘मुंबईच्या रस्त्यांपासून कुणाची सुटका नाही इतकी दारू का पिता की तुम्हाला धड चालता येत नाही’, ‘न्यासा पण आई काजोलसारखी आहे’, काजोलही बऱ्याचदा धडपडत असते, ती खरंच पडता पडता वाचली की तिच्या चालण्याची स्टाईलच अशी आहे, न्यासा पडता पडता वाचली, अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Back to top button