

Active Brain & Sharp Memory : आयुर्वेदानुसार शंखपुष्पी ही अशी औषधी आहे, जी मेंदू आरोग्यपूर्ण राखतेच; पण इतरही अनेक आजार दूर करण्यासाठी औषधी म्हणून तिचा वापर केला जातो. शंखपुष्पी थंड प्रकृतीची वनस्पती आहे. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी शंखपुष्पी अत्यंत उपयुक्त ठरते. पूर्वीच्या काळी गुरुजन आपल्या शिष्यांना ब्राह्ममुहूर्तावर शंखपुष्पी मुळासह ताजी वाटून दूध किंवा लोणी याबरोबर मध, खडीसाखर किंवा साखर मिसळून सेवन करण्याचा उपदेश देत असत. शंखपुष्पी आणि गुळवेलाचे सत्त्व, आघाड्याच्या मुळाचे चूर्ण; विडंगाचे बिजाचे चूर्ण; ब्राह्मी, वेखंड, शतावरी आणि छोटा हिरडा हे सर्व समप्रमाणात एकत्र करून सकाळ-संध्याकाळ 3 -3 ग्रॅम प्रमाणात दुधाबरोबर सेवन करावे. त्यामुळे स्मरणशक्ती तीव्र बनते.
संबंधित बातम्या :
शंखपुष्पी मुळासह वाटून त्याचा लेप डोक्यावर लावल्यास केस लांब, सुंदर आणि चमकदार होतात. शंंखपुष्पीची मुळे उगाळून त्याच्या रसाचे काही थेंब नाकात घातल्यास, केस अवेळी पांढरे होण्याची समस्या उद्भवत नाही. हाच रस मधामध्ये मिसळून प्यायल्यास केस गळणे थांबते आणि केस दाट, मजबूत आणि चमकदार होतात. शंखपुष्पी, भृंगराज आणि आवळा यांच्यापासून तयार केलेले तेल केसाला लावल्यास केस घनदाट होतात.
मधुमेह नियंत्रणासाठी शंखपुष्पीचे चूर्ण 2 ते 4 ग्रॅम इतक्या प्रमाणात सकाळ-संध्याकाळी गायीच्या दुधाच्या लोण्याबरोबर किंवा पाण्याबरोबर सेवन केल्यास चांगला फायदा होतो. शंखपुष्पीचे सलग सहा महिने नियमित सेवन केल्यास आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये फरक पडतो. त्यासाठी नियमित 3 ते 5 ग्रॅमपर्यंत चूर्ण सेवन करता येते. शरीरातील रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र यांंचे पोषण करणारी, आयुवर्धक, त्वचा उजळणारी, आवाज आणि उच्चार चांगले करणारी, तणाव दूर करणारी तसेच कृमींचा नाश करणारी अशी ही वनस्पती आहे.
हे ही वाचा :