

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेतील आठवा दिवस (दि.१) गाजवला. दिवसाची सुरूवात नेमबाजीच्या सुवर्ण पदकाने तर शेवट बॅडमिंटनमधील रौप्य पदकाने झाली. आजच्या दिवसात भारतीय खेळाडूनी एकूण १५ इतकी पदके कमवली. यात ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. (Asian Game 2023)
तत्पूर्वी भारतीय खेळाडूंनी काल (दि.३०) आणि आज केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय संघ पदतालिकेत चौथ्या स्थानी कायम आहे. आज केलेल्या शानदार कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत एकूण ५३ पदके पटकावली आहेत. जाणून घेवूया आजवरच्या भारताच्या पदक विजेत्या खेळाडूंची कामगिरी
हेही वाचा :