

कासा ः पुढारी वृत्तसेवा : मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजता दरम्यान विवळवेढे आणि धानीवरी गावाच्या मध्ये गुजरात मार्गिकेवर धागे धुण्याच्या केमर्ट नामक ऑईल वाहून नेणार्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे टँकर मधील ऑईल महामार्गावर पसरले असून यावरून दुचाकीस्वारांना प्रवास करणे अवघड झाले आहे.
संबंधित बातम्या
मुंबईकडून गुजरातकडे निघालेल्या टँकरमध्ये आंतरिक बिघाडामुळे अचानक आग लागली असून चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला घेत चालक उतरल्यामुळे त्याला कोणतीही इजा झालेली नाही. आगीच्या घटनेमुळे साधारण दोन तास दोनही मार्गीकेवर मोठी वाहतूक कोंडी होऊन जवळपास सहा ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल झाले होते. एकूणच वाढत्या अपघातांमुळे हा महामार्ग सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.