

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी 6१ नगरसेवकांनी अखेर माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी ६६ नगरसेवकांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. केवळ खासदार राजन विचारे यांच्या पत्नी आणि नगरसेविका नंदिनी विचारे यांनी मात्र शिंदे गटात प्रवेश केलेला नाही. ६६ नगरसेवकांचा जाहीर प्रवेशामुळे आता ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना विरोधात एकनाथ शिंदे गट अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सुरुवातीला काही नगरसेवकांनी बॅनर लावून शिंदे यांना समर्थन दिले होते. काही ठिकाणी शिंदे यांना समर्थन देण्यासाठी शक्तीप्रदर्शनदेखील करण्यात आले होते. शिंदे यांना ठाणे महापालिकेतील सर्वच शिवसेना नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात होते. मात्र जाहीररित्या शिंदे गटात कोणीही प्रवेश घेतला नव्हता. काही नगरसेवक वेट अँड वोचच्या भूमिकेत होते. मात्र बुधवारी माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ६१ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
संसदेत भावना गवळी यांना प्रतोद पदावरून हटवून खासदार राजन विचारे यांची वर्णी लावण्यात आली असल्याने राजन विचारे हे शिवसेनेसोबत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ठाणे पालिकेत माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी मात्र शिंदे गटात प्रवेश केला नाही किंवा त्यांना पाठिंबा दिलेला नाही. सेनेचा केवळ एक नगरसेवक वगळता ६७ पैकी ६१ नगरसेवकांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याने ठाण्यात आता सर्वसामान्य शिवसैनिक विरोधात शिंदे गट असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
हे ही वाचा :