Latest
Earthquake : ताजिकिस्तानमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
पुढारी ऑनलाईन डेस्क : ताजिकिस्तानला आज सकाळी ६:४२ वाजता ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. त्याची खोली ८० किलोमीटर इतकी नोंदवली गेल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने सांगितले. आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
अरबी समुद्रात (Arabian Sea) भूकंपाचे धक्के
अरबी समुद्रात (Arabian Sea) शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.१ एवढी असल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले. ९.५२ वाजता भूकंपाचे धक्के बसले. त्याचे केंद्र कुठे होते याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा :

