

चंदीगड : पुढारी ऑनलाईन
कुणाला कशाची हौस असेल, याचा अंदाज कधीच लावता येईल. हौसेपोटी लोक काय काय करतात! मग तेथे पैशांचाही विचार केला जात नाही. असाच एक हौशी व्यक्तीने आपल्या हौसेपोटी तब्बल १५ लाखांची नंबरप्लेट आपल्या गाडीला लावल्याचे वृत्त समोर आले आहे. ही एक हौशी व्यक्ती आहे. चंदीगढची. ४२ वर्षीय या व्यक्तीचं नाव आहे ब्रिज मोहन. पण, यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, त्याने गाडी घेतलीय ७१ हजारांची आणि नंबरप्लेट लावलीय १५ लाखांची. ही गोष्ट इथेचं थांबलेली नाही. त्याने गाडीला व्हीआयपी नंबरही मिळवलाय.
ब्रीज मोहन हा जाहिरात व्यवसायात आहे. त्याने ७१ हजारांची होंडा ॲक्टिव्हा स्कूटर खरेदी केलीय, असे वृत्त एका इंग्रजी वेवसाईटने दिलेली आहे. त्याने ॲक्टिव्हाला तब्बल १५ लाख ४४ हजारांची नंबरप्लेट लावलीय. हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. पण हे खरं आहे. त्याच्या गाडीचा नंबर CH01-CJ-0001 असा आहे. त्याने रजिस्टरिंग अँड लायसेन्सिंग ॲथॉरिटी (आरएलए) मध्ये आयोजित लिलावाच्या माध्यमातून व्हीआयपी नंबर मिळवलाय.
तो भविष्यात कार घेण्याचं नियोजन करत आहे. जर भविष्यात कार घेतली तर या स्कूटरचा नंबर कारला ट्रान्सफर करणार असल्याचं त्यानं सांगितलं. हौसपोटी त्याने ही गाडी खरेदी करून नंबर प्लेटला इतके सारे पैसे खर्च केल्याचं म्हटलं आहे.
चंदीगढमध्ये नव्या सीरीजचा लिलाव होता. ब्रिज मोहन म्हणाला, मला असं वाटलं की, माझ्याकडे व्हीआयपी नंबर असायला हवा. माझी इच्छा होती की, माझ्याकडे चंदीगढचा ०००१ नंबर असावा. या वर्षी जानेवारीमध्ये सीएच ०१-सीएच सीरीजचा ०००१ नंबरचा २४.४ लाख रुपयांमध्ये लिलाव झाला होता. हा नंबर चंदीगढच्या अमन शर्माने खरेदी केला होता. यावर्षी नव्या लिलावात नवी सीरीजसोबत जुन्या सीरीजचे शिल्लक राहिलेले नंबरदेखील लिलावात ठेवण्यात आले होते.