urfi javed : उर्फीच्या पँटेवर पँट! | पुढारी

urfi javed : उर्फीच्या पँटेवर पँट!

पुढारी ऑनलाईन

उर्फी जावेदचे पोशाख हे निव्वळ थट्टेचे विषय बनलेले असतात. आताही तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामधील तिचा पोशाख पाहून अनेकांनी कपाळावर हात मारून घेतला. यामध्ये उर्फीने तपकिरी रंगाची पँट परिधान केलेली आहे. या पँटेवरच तशीच आणखी एक पँट तिरकी करून लावलेली आहे. अशा दोन-दोन पँटेतील ही ललना पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले. अनेकांनी तिच्या या अजब ड्रेसिंग सेन्सबाबत कमेंटस् केले. उर्फी मूळची लखनौची आहे. तिने 2016 मध्ये टीव्ही मालिकेतून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक मालिका व शोमध्ये काम केले. ‘बिग बॉस ओटीटी’मुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

 

Back to top button