Latest
Cheetah : आणखी १२ चित्त्यांचे भारतात होणार आगमन
भोपाळ; वृत्तसंस्था : चालू महिन्यातच नामिबियाहून मध्य प्रदेशातील कुनोच्या जंगलात सोडण्यासाठी आणखी 12 चित्ते दाखल होतील. त्यात 7 नर, तर 5 माद्या आहेत. हे चित्ते गेल्या 6 महिन्यांपासून क्वारंटाईन आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ही माहिती दिली. (Cheetah)
गतवर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियाहून आणलेले 8 चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. कुनो उद्यानाच्या अधिकार्यांनी कर्नाटकमधील बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या 20 व्या बैठकीत या 12 चित्त्यांच्या आगमनाबाबत एक प्रेझेंटेशन सादर केले.
अधिक वाचा :

