आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आनंदाचा : रामदास कदम

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आनंदाचा : रामदास कदम

Published on

खेड, पुढारी वृत्तसेवा : आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आनंदाचा आहे. शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला आज शांती लाभेल. शिवसेना व धनुष्यबाण बाळासाहेबांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे यांच्या हाती गेला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते रामदास कदम यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शुक्रवारी (दि.१७) खेड येथे दिली. शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली.

यावेळी ते म्हणाले, आजचा दिवस हा आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा विडा उचलला होता. परंतु, मी या पूर्वीच सांगितले होते. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा शिवसेना वाचवण्याचे काम केले आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा आखलेला डाव खऱ्या अर्थाने उलटला गेला आहे. मी महाराष्ट्रातील बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांचे अभिनंदन करतो. उद्धव ठाकरे खेडमध्ये ५ मार्च रोजी सभा घेत आहेत त्यांची सभा झाल्यानंतर मी राज्यातील ३५ जिल्ह्यात सभा घेऊन शिवसेनेत नक्की काय घडत होते. हे महाराष्ट्रातील जनतेला सांगणार आहे, असे रामदास कदम म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news