पवनचक्की गार्डन, झीपलाईनने वाढविली देवगडच्या पर्यटनाची शान | पुढारी

पवनचक्की गार्डन, झीपलाईनने वाढविली देवगडच्या पर्यटनाची शान

देवगड, पुढारी ऑनलाईन : कोकणला निसर्गसंपन्नतेची देणगीच लाभली आहे.लाल तांबडे कातळ, भणाणणारा वारा, शुभ्र वाळूचा किनारा असलेले देवगड याला अपवाद नाही. देवगडची पवनचक्की जवळच असलेले गार्डन, साहसी पर्यटनांचा आनंद लुटणारी झीपलाईन, शुभ्र साळणारा पण तेवढाच शांत व सुरक्षित असणारा देवगडचा समुद्रकिनारा, देवगड बीच पर्यटकांना खुणावतोय.

देवगड येथे  न.पं. झाल्यापासून अधिकचा पर्यटन निधी मिळायला लागल्यावर शहरातील पर्यटनस्थळाचा विकास होवून लागला. पर्यटन स्थळांवर पर्यटकांसाठी प्राथमिक सुविधा मिळाव्यात म्हणून निधी येतो आहे. यामुळे ही पर्यटनस्थळे पर्यटकांच्या अधिक जवळ गेली. कारण पर्यटनस्थळावर जाणे सुविधांमुळे शक्य झाले आहे.

तसेच, भारतातील समुद्रकिना-यावरील पहिली झीपलाईन देवगडमध्येच साकारली आहे. न.पं.ने पर्यटन निधीतून गार्डन उभे केले.यामुळे पर्यटकांचा ओढा या क्षेत्राकडे वाढला आहे.समुद्रकिना-यावर उभारलेले पदपथ तसेच पथदीप यामुळे पर्यटकांना किनाèयावरचा रात्रीचा आनंद घेणे शक्य आहे शिवाय झीपलाईनमुळे साहसी पर्यटनाचा आनंदही पर्यटक घेवू लागले आहेत. भविष्यात अनेक प्रकल्प या ठिकाणी प्रस्तावित असल्याने पर्यटक खुलेल एवढे मात्र नक्की.

हे ही वाचलं का 

Back to top button