यावेळी सोमय्या म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार सुरू आहे, असे म्हणणार्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेऊन या घोडेबाजार करणार्यांविरोधात राज्याच्या पोलिस महासंचालकांनी कारवाई करावी. तसेच आमदारांना घोडे म्हणण्याचे काम गाढवच करू शकतात, अशी टीका केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यसभा निवडणूक, मुख्यमत्र्यांशी संबंधित श्रीजी होम कंपनी, सचिन वाझेचे माफीचा साक्षीदार होणे आदी बाबींवर भूमिका मांडली. सोमय्या म्हणाले, आपल्याच पक्षाच्या आमदारांवर संशय व्यक्त करणे बेईमानी आहे. त्यामुळे या निवडणुकीत खरेच घोडेबाजार होत असेल, तर त्याची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे, याबाबत सोमय्या म्हणाले, आता चौथी लाट येणार असली, तरी तिची तीव—ता फारशी नाही. लोकांनी काळजी घ्यावी व सर्व व्यवहार सुरू ठेवावेत, असे आवाहन त्यांनी केले.