सोलापूर : तरडगावच्या निशांतचे MPSC परिक्षेत यश! दुसऱ्या प्रयत्नात पीएसआय पदी निवड | PSI Result

सोलापूर : तरडगावच्या निशांतचे MPSC परिक्षेत यश! दुसऱ्या प्रयत्नात पीएसआय पदी निवड | PSI Result
Published on
Updated on

पटवर्धन कुरोली; पुढारी वृत्तसेवा : तरडगाव मधील पवार कुटुंबाचा आनंद गगनात मावेना. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC PSI Result) घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पीएसआयपदी उत्तीर्ण झालेला गावातील पहिला अधिकार निशांत शिवमूर्ती पवार हा अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने हा यशाचा पल्ला गाठला आहे.

तरडगाव येथील निशांत पवार याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद तरडगाव शाळा,माध्यमिक शिक्षण पटवर्धन कुरोली प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय, तसेच पदवीचे शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे बी ए इंग्लिश या विषयांमध्ये पदवी धारण केली. पदवीचे शिक्षण घेत असताना ज्ञानगंगा या अकॅडमीमध्ये अभ्यास सुरू ठेवला त्यानंतर 2018 मध्ये पहिल्या प्रयत्नांमध्ये अपयश आले त्यामुळे थोडी निराशा आली त्यावर मात करत 2020 मध्ये त्याने परीक्षा देऊन दुसऱ्या प्रयत्नात यशाचा उंच पल्ला गाठला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने या पदापर्यंत मजल मारली आहे. वडील सहकारी साखर कारखान्यात कामाला अल्पभूधारक असल्यामुळे खूप तारेची कसरत करावी लागली परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्याने पुणे ऐवजी सातारा हे शहर अभ्यास करण्यासाठी निवडले कारण पुण्यासारख्या ठिकाणी खर्च जास्त येतो म्हणून त्याहून कमी खर्च सातारा या शहरात येतो म्हणून त्याने सातारा ह्या शहराची निवड करुन पार्ट टाइम जॉब करत त्याने अभ्यास सुरू ठेवत आज पीएसआय या पदापर्यंत मजल मारली आहे गावात आनंद उत्सव साजरा करत सत्कार करत गावातून मिरवणूक काढण्यात आली.

बारावीनंतर पदवीसाठी सातारला गेलो काही दिवस पोलीस भरतीची तयारी केली त्यानंतर असं वाटलं.स्पर्धा परीक्षेची तयारी करावी आणि त्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली ज्ञानगंगा अकॅडमीतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांचे मार्गदर्शन घेऊन. अभ्यासाला चांगल्या प्रकारे सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात अल्पशा मार्काने अपयश आले. सोबत चे काही मित्र यशस्वी झाले.काही काळ नैराश्य आले.पण त्यातून स्वतःला सावरत २०२० ची जाहिरात आल्यानंतर पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे गेलो. लेखी, मैदानी व तोंडी सर्व ठिकाणी चांगले गुण मिळाले. परंतु निवड यादी लवकर लागत नसल्याने पुन्हा काहीसा अस्वस्थ होतो. परंतु आज दुपारी यादी लागली आणि खूप आनंद झाला. आई-वडील खूप कष्ट घेत आहेत. याची जाणीव होती. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून अभ्यास केला. मिळालेले यश केवळ त्यांच्यामुळेच आहे.
– निशांत शिवमूर्ती पवार पोलिस उपनिरीक्षक

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news