MPSC Result : ‘MPSC गट ब मुख्य परीक्षा २०२० PSI’ ची तात्पुरती गुणवत्ता व निवड यादी जाहीर | पुढारी

MPSC Result : 'MPSC गट ब मुख्य परीक्षा २०२० PSI' ची तात्पुरती गुणवत्ता व निवड यादी जाहीर

पुढारी ऑनलाइन डेस्क : MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा -2020 पोलिस उप निरीक्षक या परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता व निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्या आधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प मागविण्यात आले आहे. त्याकरिता दि.5 ते 11 जुलै, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आले आहे. MPSC च्या ट्विटर हँडलवरून याची माहिती देण्यात आली आहे. ट्विटरवर याचे प्रसिद्धीपत्रक पोस्ट करण्यात आले आहे. वाचा प्रसिद्धी पत्रकातील माहिती जशीच्या तशी…

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा – २०२० पोलीस उप निरीक्षक या परीक्षेची तात्पुरती गुणवत्तायादी व ई.डब्ल्यु.एस. प्रवर्गासाठी राखीव असलेल्या ६५ पदांचा निकाल राखीव ठेऊन तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे.

२. प्रस्तुत परीक्षेची सदर तात्पुरती निवड यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील
विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये /
शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवारांचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो.

३. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील मा. न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गासाठी राखीव पदांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

४. प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर वेबलिंक दिनांक ५ जुलै, २०२३ रोजी १२:०० वाजेपासून दिनांक ११ जुलै, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. उमेदवारांकडून सदर विकल्प प्राप्त झाल्यानंतर आवश्यक तपासणीनंतर अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

५. ऑनलाईन पध्दतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राहय धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाहीत.

६. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही.

७. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक
अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८०० १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support-
online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल.

ठिकाण:- नवी मुंबई.
उपसचिव (परीक्षोत्तर अराजपत्रित) महाराष्ट्र लोकसेवा आयोग.

हे ही  वाचा :

Sharad Pawar: माझा फोटो वापरू नका: शरद पवारांच्या इशाऱ्याने बंडखोरांना धक्का

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने, वातावरण पेटलं…

Back to top button