

बुलढाणा, पुढारी ऑनलाईन: सिंदखेड राजा- मेहकर मार्गावर दुसरबीड गावानजीक तडेगाव फाट्याजवळ डंपर उलटून १२ मजूर ठार झाले.
समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुराला तडेगाव येथील कॅम्पमध्ये घेऊन जाणाऱ्या डंपरला अपघात झाला.
यात १६ जण गंभीर झाले होते. गंभीर जखमींना जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात घडला. दुसरबीड येथून लोखंडी गज घेऊन एक डंपर समुद्धी महामार्गच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या तडेगाव येथील कॅम्पकडे जात होता.
यात महामार्गावर काम करणारे मजूरही बसलेले होते तडेगाव नजीक अचानक हा डंपर उलटून १२ मजूर ठार झाले.
यात १६ जण गंभीर जखमी झाले. तर १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमींना त्वरित जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
यातील तीन जखमींना सिंदखेड राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
अपघातामधील मृत व गंभीर जखमी मजूर मध्यप्रदेश आणि बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
हेही वाचा: