सांगलीत क्रिकेटवर सट्टा लावणार्‍याला अटक

सांगलीत क्रिकेटवर सट्टा लावणार्‍याला अटक

Published on

सांगली : पुढारी वृत्तसेवा
सध्या सुरू असलेल्या महिलांच्या वर्ल्ड कपमधील भारत – पाकिस्तान या क्रिकेट सामान्यावर सट्टा लावणारा रोहित अनिल संकपाळ (वय 22, रा. गावभाग, रोहिदास नगर) याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून मोबाईल, सट्ट्याचे साहित्य असा 4 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शिंदे मळा येथील एका घरात संकपाळ हा क्रिकेट सट्टा खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पाहणी केली असता संकपाळ हा खोलीत मोबाईलवर संशयितरित्या फोनवर बोलत काहीतरी लिहीत असलेला दिसला. पोलिसांनी त्याला अटक करून संजयनगर पोलिस ठाण्याच्या दिले. पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, प्रशांत निशानदार, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news