सत्तासंघर्षावर उद्यापासून सलग तीन दिवस सुनावणी

सत्तासंघर्षावर उद्यापासून सलग तीन दिवस सुनावणी
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. ही सुनावणी 23 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस युक्तिवाद झाला होता.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ सुनावणी करत आहे. गेल्या आठवड्यात हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे न देता याच खंडपीठासमोर सुनावणी चालेल, असे न्यायालयाने म्हटले होते. आता या आठवड्यात 21, 22 आणि 23 म्हणजे सलग तीन दिवस याप्रकरणी घटनापीठाचे कामकाज होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news