संजय राऊतांचे विमानतळावर ढोल ताशा पथकांच्या गजरात जंगी स्वागत; हजारो शिवसैनिक एकवटले

संजय राऊतांचे विमानतळावर ढोल ताशा पथकांच्या गजरात जंगी स्वागत; हजारो शिवसैनिक एकवटले
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आज प्रथमच मुंबईमध्ये परतले. त्यांच्या मुंबईत परतण्याचा जंगी इव्हेंट शिवसेनेने केला. त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक, आमदार खासदार विमानतळावर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी उघडी जीप फुलांनी सजवण्यात आली असून ढोल ताशा पथकेही बोलावण्यात आली आहेत. काही शिवसैनिकांनी शंखही सोबत आणला आहे. किरीट सोमय्यांचा घोटाळा पुराव्यानिशी बाहेर काढल्याचे ते म्हणाले.

संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईनंतर भाजप, किरीट सोमय्या आणि ईडीवर कडाडून प्रहार सुरु केला आहे. त्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांनाही टार्गेट केलं आहे. दुसरीकडे काल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ईडी कारवाईचा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या आहेत.जय राऊत हे ज्येष्ठ पत्रकार तसेच राज्यसभेचे खासदार आहेत,याची कल्पना पंतप्रधानांना दिली.राऊतांच्या घरी केंद्रीय यंत्रणेने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. ८ ते १० एकर जमीन, फ्लॅट ताब्यात घेण्यात आले आहेत,हे पंतप्रधानांच्या निदर्शनात आणून दिल्याचे पवारांनी सांगितले.

यासंबंधी पंतप्रधानांची प्रतिक्रिया विचारली नाही. पंरतु,यावर ते गंभीरपणे विचार करतील आणि त्यावर काही तरी पावले उचलतील,अशी भावना पवारांनी व्यक्त केली. संजय राऊतांच्या विरोधात कारवाई करण्याची गरज काय होती? त्यांच्यावरील आरोप काय? ते केवळ सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली का? असा सवालही पवार यांनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्थिर आहे,हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुढच्या निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेत येणार,असा दावा देखील शरद पवार यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष टोकाला गेला आहे. भाजपने ईडीच्या माध्यमातून आता मातोश्रीपर्यंत पोहोचण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे या संघर्षाला आता आणखी धार आली आहे. मुख्यमंत्र्याचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊत यांच्यावरही कारवाई झाल्याने भाजप आणि शिवसेनेमधील संघर्ष आणखी धारदार होण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news