राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा ! वंचित बहुजन आघाडी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेणार | पुढारी

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा ! वंचित बहुजन आघाडी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेणार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर केलेल्या वक्तव्याची चौकशी करुन त्यांचा सखोल तपास करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अबूल हसन खान आणि महासचिव आनंद जाधव याच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांचा या शिष्टमंडळात समावेश असणार आहे.

राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर केलेल्या वक्तव्याची चौकशी करुन, यात काही तथ्य आढळल्यास तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करणार आहेत. राज ठाकरेंनी केलेले वक्तव्य हे देशात धार्मिक तेढ निर्माण करून दंगे घडवू शकतात. यामध्ये धार्मिक द्वेष निर्माण करून, दंगे घडवण्याचा राज ठाकरेंचा कट दिसून येत असल्याचेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा व UAPA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबतचे रितसर निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई पोलिस आयुक्तांना देण्यात येणार आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button