

पुढारी ऑनलाईन डेस्क: मॉक ड्रील करताना रशियाच्या मंत्र्याचा मृत्यू झाला आहे. रशियाचे आपात्कालीन मंत्री येवगेनी जिनिचेव हे एका फोटोग्राफरचा जीव वाचवण्यास गेले आणि त्यांना अपघात झाला. रशियन राष्ट्रपती कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी ही माहिती दिली.
रशियन राष्ट्रपती कार्यालय क्रेमिलनने दिलेल्या माहितीनुसार, आपत्कालीन मंत्री येवगेनी जिनिचेव यांचे आर्कटिकमध्ये निधन झाले.
आर्कटिक भागामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर काय करावे यासाठी प्रशासन मॉक ड्रील घेत होते. या मॉक ड्रीलमध्ये ते सहभागी झाले होते.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या मॉक ड्रील वेळी एक फोटोग्राफर पाण्यात पडला.
त्याला वाचविण्यासाठी मंत्र्यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, ते एका मोठ्या खडकावर आपटले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी रशियाच्या मंत्र्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मंत्री येवगेनी जिनिचेव एका कड्याजवळ उभे होते. त्याच वेळेस कॅमेरामनचा पाय घसरल्याने तो खाली पडला.
त्याला वाचवण्यासाठी जिनिचेव यांनी पाण्यात उडी घेतली. त्याचवेळी ते एका खडकाला आदळले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आपात्कालीन सेवेत हेलिकॉप्टरमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा: