पैठण तालुक्यात मंगळवारी रात्री जाेरदार पावसामुळे घराची भिंत पडून जोनांदर येथील ८५ वर्षे वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. सुंदरबाई साहेबराव गरड असे त्यांचे नाव आहे.
नांदर परिसरामध्ये मंगळवारी रात्री जोरदार पाऊस पडला रात्रीच्या वेळेस पावसामुळे सुंदर बाई गराड या ंच्या घराची भिंत पावसाने पडले. याठिकाणी वयोवृद्ध महिला एकटीच राहत होती. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी, मंडळ अधिकारी बी.आर खेडकर, तलाठी आर.पी सोनवणे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
पावसामुळे नाथसागर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत येथील धरणांमध्ये १६ हजार ३२५ क्यूसेक्स पाण्याची आवक वरील धरणातून येत आहे मागील वर्षी या धरणाची पाण्याची टक्केवारी ९८ .४० होती सध्या धरणाची ४७ .९१ टक्केवारी नोंद झाल्याची पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप जाधव, उप अभियंता काकडे, गणेश कराडकर यांनी सांगितले आहे.
मंगळवारी रात्री पैठण तालुक्यात जोरदार पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस ११७. मिलिमीटर आडुळ परिसरात झाला आहे यासह विहामांडवा ७३,लोहगाव ४८, पाचोड ७०, नांदर ७४,बालानगर ७५, ढोरकीन ७१, बिडकीन ११४, पिंपळवाडी पिं ३५, पैठण ४७ मी.मी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचलं का?