

परळी; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशभरात 'हर घर तिरंगा' या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. नागरिकांच्या घरांवर तिरंगा ध्वज फडकवण्यात येत असून अनेक शासकीय कार्यालयेदेखील विद्युत रोषणाईने चमकत आहेत.
सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरण देखील आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. धरणाच्या चार वक्र दरवाजातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर राष्ट्रध्वजाच्या तिन्ही रंगाचा प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे उरमोडी धरण प्रथमच विद्युत रोषणाईने चमकत आहे. धरण प्रशासनाने केलेल्या विद्युत रोषणाई पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिक या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत.
हेही वाचा