परिणीती चोप्रा म्हणते ‘हा’ अभिनेता माझा क्रश!

परिणीती चोप्रा म्हणते ‘हा’ अभिनेता माझा क्रश!

Published on

मुंबई; पु़ढारी आनलाईन : बॅालिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत त्यांनी त्यांच्या अभिनयाने व सूंदरतेमुळे लोकांच्या मनावर भुरळ घातली आहे. त्यांचे लाखो-कोट्यवधी चाहते जगभरात पाहायला मिळतात. हे कलाकार अनेकांचे क्रश आहेत. पण याच कलाकारांचेही कुणी ना कुणी तरी क्रश (प्रेम) असते. सध्या याच कारणाने अभिनेत्री परिणीती चोप्रा चर्चेत आली आहे. कारण तिचाही कुणीतरी क्रश आहे.

एका मुलाखतीदरम्यान, परिणीती चोप्रा हिने आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. यामध्ये तिने तिचा क्रश काेण आहे? याबद्दलही यावेळी सांगितले आहे.

काेण आहे परिणीतीचा क्रश? 

"आ ही जाता है जिस पर दिल आना होता है, प्यार दिवाना होता है, मस्ताना होता है…! राजेश खन्ना यांच्या 'कटी पतंग' चित्रपटातील गाण्याच्या या ओळी खर्‍याच आहेत. याला परिणीतीदेखील अपवाद नाही.

बी टाऊनचा नवाब म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सैफ अली खान हा तिचा क्रश असल्याचे परिणीतीने म्हटले आहे. परिणीतीला सैफ अली खान खूप आवडतो. परीने खुलेआम अनेकदा सांगितले आहे. जर संधी मिळाली तर सैफला ती किडनॅपही करू शकते. असे परिणीतीने याआधी म्हटले होतं.

"तिला माहिती आहे की, मला सैफ किती आवडतो"

बी टाऊनची बेबाे म्हणजे करिना कपूरला सर्व काही माहिती असल्याचे परिणीतीने म्हटले आहे. "तिला माहिती आहे की, मला सैफ किती आवडतो" असे परिणीतीने सांगितले.

कपिल शर्मा शोमध्येदेखील परिणीतीने याबद्दल खुलासा केला आहे.

परिणीतीची ही गाेष्ट जेव्हा सैफला कळली तेव्हा…

जेव्हा कपिलने सैफला त्याची प्रतिक्रिया विचारली तेव्हा सैफ पूर्णपणे अवाक झाला. त्याला काय बोलावं ते समजत नव्हतं. यासोबतच कपिलने गमतीने म्हटलं की, जर नशीब असावं तर सैफ अली खानसारखं आधीच करिनासारखी पत्नी मिळाली आहे आणि आता परिणीतीलाही त्याला किडनॅप करायचं आहे.

हे वाचलतं का? 

हे हि पहाःसरू आजीला शिव्या कुणी शिकवल्या ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news