

दोन गटांमध्ये झालेल्या लहान वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन झालेल्या मारामारीत लाथा, बुक्या काठी, लोखंडी रॉडचा वापर होऊन एका गटातील तीन जण गंभीररित्या जखमी झाले असून पोलिसांनी याबाबतीत दुसऱ्या गटातील आठ जणांना ताब्यात घेतले असून यापैकी तीन जण अल्पवयीन असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी दिली.
आकाश गोफने, सुरज बाळू चव्हाण ,किरण बाळू चव्हाण, कृष्णा माने ,सुशील उर्फ बाळा शिंदे (सर्व रा. नारायणगाव ता जुन्नर जि. पुणे) व तीन अल्पवयीन असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद आवेश आदम आत्तार (वय २६ रा. नाना पाटील नगर नारायणगाव ता जुन्नर जि पुणे) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास मुस्लिम मोहल्ला नारायणगाव याठिकाणी नसरुद्दीन शहा बाबा दर्गा जवळ आकाश गोफने, सुरज बाळू चव्हाण ,किरण बाळू चव्हाण, कृष्णा माने ,सुशील उर्फ बाळा शिंदे, तीन अल्पवयीन व त्याच्या सोबत असणारे काही लोकांनी लोखंडी रॉड लाकडी दांडके व दगडे घेऊन बेकायदेशीर जमाव जमून मुस्लिम मोहल्ल्यातील मोमीन फिरोज इनामदार ,साहिल रज्जाक आतार व फिर्यादी यांना मारहाण करून गंभीर जखमी केले व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
या फिर्यादीच्या जबाबनुसार नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी मुस्लिम समाजाचे असल्याने ही भांडणे जातीयवादातून झाले असल्याचा अपप्रचार केला जात होता. मात्र ही भांडणे फिर्यादी व आरोपी यांचे तात्कालीक कारणावरून झाले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान , दुसऱ्या गटाकडून आवेश आदम आत्तार, मोमीन फिरोज इनामदार ,साहिल रज्जाक आतार यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे करीत आहेत.
हेही वाचा :