

ठाणे पुढारी वृत्तसेवा : आमदार रवी राणा हे सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करतात. त्यांनी दोन दिवसांपूर्वी मातोश्रीच्या बाहेर वृक्ष वावून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा हे सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहतात. मात्र आज एका फेसबुक लाईव्ह मध्ये बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केले होते. याच टीकेला शिवसेना नवीन पनवेल उपविभागप्रमुख प्रशांत जाधव यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
रवी राणा तुझी लायकी काय आणि तु बोलतो किती, कोण आहे हा रवी राणा आम्ही ओळखतं नाही. असल्या फालतू लोकांना आम्ही किंमत देत नाही. स्वतःला मोठं करण्यासाठी अशी काही मंडळी आपल्या नेत्यांच्या समोर सत्ताधाऱ्यांवर टीका टिप्पणी करत असतात. अशा लोकांना आम्ही जास्त महत्त्व देत नाही. यापुढे रवी राणांनी आपल्या लायकी मध्ये राहावे अशी टीका प्रशांत जाधव यांनी केली आहे.
या बाटग्यांनी सरकार वरती बोलावे किंवा सल्ले द्यावेत, हा विनोदच म्हणावा लागेल. कुणीतरी एक बोगस रवी राणा पुढे करून सरकार वरती भुंकत आहे. कोण कुठले हे राणा यापुढे तोंड सांभाळून वापरा अन्यथा शिवसैनिक थोबाड फोडतील. अशी इशारा प्रशांत जाधव यावेळी दिला.