

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन: भारताची कुस्तीपटू प्रिया मलिक हिने आज ऐतिहासिक कामगिरी केली. प्रिया मलिक हिने जागतिक कुस्ती स्पर्धेत (वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप ) सुवर्ण पदक पटकावले.
अधिक वाचा
हंगेरी येथे जागतिक कुस्ती स्पर्धा (वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप ) सुरु आहेत. या स्पर्धेत प्रिया ७५ किलो वजनी गटात सहभागी होती. तिचा अंतिम सामना बेलारुसच्या कुस्तीपटूबरोबर होता.
अधिक वाचा
हा सामना प्रिया मलिकने ५-0 असा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली.
टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी शनिवारी भारताची सुरुवात दिमाखदार झाली. ४९ किला वजनी गटात तिने रौप्यपदकाला गवसणी घातली.
ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिप्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली आहे.
यानंतर दुसर्या दिवशी जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकला. या दोन्ही खेळाडूंच्या अविस्मरणीय कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रात आनंदाला उधाण आले आहे.
हेही वाचलं का?