जळगाव : भडगाव तालुक्यातील जवानाचा रेल्वेत प्रवासादरम्यान मृत्यू, गावावर शोककळा

जळगाव : भडगाव तालुक्यातील जवानाचा रेल्वेत प्रवासादरम्यान मृत्यू, गावावर शोककळा
Published on
Updated on

जळगाव : भातखंडे (ता. भडगाव) येथील रहिवासी सैन्य दलातील जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील (वय ४०) यांचे युनीट बिकानेर येथून आगरतळा या ठिकाणी जात असतांना गोरखपुर जवळ रेल्वे प्रवासात त्यांची अचानक तब्येत खराब झाली. तेथील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने भातखंडे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील रहिवासी तथा सैन्य दलातील जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील (वय ४०) यांचे, काल अकस्मात निधन झाले. आपल्या सहकार्‍यांसोबत बिकानेर येथून त्रिपुरा येथे रेल्वेने जात असताना, प्रवासात त्यांना भोवळ आली. ४ रोजी बिकानेरहून पूर्ण युनिटसोबत ते त्रिपुरा येथे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते. प्रवासात त्यांना अचानक भोवळ आली. दरम्यान गोरखपूर येथे रेल्वे थांबवून त्यांना सहकारी व अधिकार्‍यांनी उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला.

२० वर्षापासून सैन्यदलात बजावले कर्तव्य…
सैन्य दलातील जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील हे मार्च २००३ मध्ये नाशिक या ठिकाणी भरती झाले होते. ते ३०५ फिल्ड रेजिमेंट मध्ये देशसेवा गेल्या २० वर्षापासून बजावत होते. त्यांचे ट्रेनिंग हैदराबाद व बंगलोर या ठिकाणी झाले असून ते मेस कुक या पदावर कार्यरत होते आता ते ऑफिसर्स स्पेशल कुक होते. त्यांनी सिक्कीम, जम्मू, बिकानेर, लेह, लडाख या ठिकाणी सेवा बजावली आहे.

नविन पोस्टींगवर रुजू होण्यापूर्वीच… 
बिकानेर येथून आगरताळा या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झालेली होती. पोस्टिंगवर जात असताना प्रवासादरम्यान ही घटना घडली असून, त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी इलाहाबाद येथील लष्करी रुग्णालयात नेले आहे. तेथून त्यांचे पार्थिव वाराणसी होऊन मुंबईपर्यंत विमानाने येणार आहे. मुंबईहून भातखंडे येथे आज त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी भातखंडे येथे येईल नंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शहीद जवान दत्तात्रय पाटील हे अत्यंत शांत व संयमी सोज्वळ स्वभावाचा व मनमिळाऊ होता. ते भातखंडे येथील विठ्ठल राजधर पाटील यांचे पुत्र असून त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुली, १ लहान भाऊ, १ बहीण असा परिवार आहे.

निवासस्थानी तहसीलदारांनी दिली भेट…
दरम्यान भडगाव येथील तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, एपीआय चद्रंसेन पालकर, पोलीस कॉस्टेबल स्वप्नील पाटील, विलास पाटील यांनी प्रशासनाच्यावतीने शहिद जवान दत्तात्रय पाटील यांच्या भांतखडे निवासस्थानी भेट देवुन त्याच्या परीवाराचे सांत्वन केले. तसेच त्यांच्या अंतिम संस्कारबाबत माहिती घेऊन पहाणी केली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news