गोपीचंद पडळकर, “भोक पडलेल्या फुग्याला एवढं का घाबरता”

File Photo
File Photo
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन : "आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असंतर नाही की, राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपितांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल", अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

"नारायण राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता मग पोलिसांना त्यांच्या आई -बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण सरदेसाईला अटक का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल?", असे प्रश्नही पडळकरांनी उपस्थित केले आहेत.

भाजपचे नेते गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, "ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दाने पितळ उघड पाडले. पण तुम्ही आज त्यांचाच उदो उदो करताहात. म्हणजेच बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही का", असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

"हिंदू समाजाला सडलेला म्हणणारा शर्जील उस्मान उजळ माथ्यानं महाराष्ट्रात येऊन फिरतो आणि त्यावर कारवाई करण्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी तुमचे हात थरथर कापतात. मला बाळासाहेबांच्या सामनाचे  दैनिक 'बाबरनामा'त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारायचे आहे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते", अशी टिका पडळकरांनी केली आहे.

"माननीय संजय राऊत, कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याच्या विकृतीला बांध घाला अन्यथा 'तुमच्या हम करे सो' कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील", असाही इशारा पडळकरांनी दिला आहे.

पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news