विठ्ठल मंदिराला मिळणार ७०० वर्षापूर्वींचे रूप! | पुढारी

विठ्ठल मंदिराला मिळणार ७०० वर्षापूर्वींचे रूप!

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : भाविकांचे श्रध्दास्थान असणार्‍या येथील विठ्ठल मंदिरचे रुप पालटणार आहे.  विठ्ठल मंदिराला ७०० वर्षापूर्वीचे रूप मिळणार आहे. यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने आराखडा तयार करण्‍यात आला आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ६१ कोटी ५० लाख रुपयांचा आराखडा प्राप्त झाला आहे. मंदिर समितीने नुकतीच या आराखड्यास मंजुरी दिली आहे.

आता  अंतिम मंजुरीसाठी हा आराखडा राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. यामुळे मंदिराचे रुपडे पालटणार आहे.

६१ कोटी ५० लाखांची मागणी

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी म्हणाले, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आराखड्यास मंदिर समितीने मंजूरी दिली आहे. गेल्या १८ तारखेला ही मंजुरी दिली. या सर्वंकष आराखड्यासाठी ६१ कोटी ५० लाखांची मागणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी यात्रेला महापूजेकरीता आले होते. त्यावेळी निधीस सकारात्मकता दर्शवलेली आहे.

या आराखड्याची पाच टप्प्यात विभागणी करण्यात आलेली आहे.

पाच वर्षांत अतिमहत्वाची, महत्वाची व कमी महत्वाची या पध्दतीने कामे करण्यात येणार आहेत.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे ११ व्या शतकातील असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जाते. आता पुन्हा या मंदिराला ७०० वर्षापूर्वीचे मूळ रूप देण्यात येईल.

पुरातत्व विभागाने दोन वर्षे अभ्यास करून मुळ स्वरुप देण्याचा आराखडा तयार केला आहे.

दगडी बांधकाम मूळ स्वरूपात आणले जाणार

गाभार्‍यात बसविलेले ग्रॅनाईट हटवले जाईल. त्यामागील दगडी बांधकाम मूळ स्वरूपात आणले जाणार आहे. तसेच मंदिराला मूळ हेमाडपंथी रूप देण्यात येईल. केमिकल कॉन्झर्व्हेशन, त्यानंतर जिथे दगडांची झीज झाली आहे. अशा ठिकाणी मजबुतीकरण केले जाणार आहे.

जुन्या वास्तुला सुयोग्य दिसणार नाहीत, ते घटक काढून टाकणे. असे आराखड्याचे स्वरुप आहे.

नामदेव पायरी येथील आरसीसी बांधकाम काढून तेथे दगड बांधकाम करणे. दर्शन रांगेचा मंदिराला धोका आहे. त्यामूळे दर्शन रांग हटवणे. तेथे दक्षिण बाजूच्या भिंतीला समांतर स्काय वॉक तयार करणे याचाही या आराखड्यात समावेश आहे.

बाजीराव पडसाळी वरचा जो मोकळा भाग आहे. तो झाकणे. तेथील ग्रेनाईट काढणे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आग प्रतिरोधक यंत्रणा उभारणे. इलेक्ट्रीक यंत्रणा सुरक्षित करणे. वातानुकूलित यंत्रणा बसविणे आदींचा समावेश असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ६१ कोटी ५० लाख निधीची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मंदिर विकास आराखड्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिलेले आहे.

– गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष,मंदिर समिती पंढरपूर

* पुरातत्व विभागाकडून मंदिर समितीकडे आराखडा सादर
* मंदिर समिती राज्य शासनाकडे आराखडा करणार सादर
* या सर्वंकष आराखड्यासाठी ६१ कोटी ५० लाखाची आवश्यकता
*आराखड्याची पाच टप्प्यात विभागणी
* पाच वर्षात आराखड्यानुसार पूर्ण होणार कामे
* ७०० वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर प्रत्यक्षात साकारणार

हेही वाचलं का? 

 

Back to top button