

शिये; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात महापूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील पूर स्थिती कायम आहे.
अधिक वाचा :
बुधले मंगल कार्यालयाजवळ महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे दहा ते बारा फुट तर पुण्याकडून येणाऱ्या रस्तावर जवळपास चार फुट पाणी आहे. उद्या दुपार पर्यंत तरी रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार नसल्याची शक्यता पोलिस प्रशासनाने व्यक्त केली आहे.
शुक्रवारी रात्री महामार्गावर पुराचे पाणी आल्याने पहिल्यांदा पुण्याकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. त्यानंतर एकाच रस्त्याने दुहेरी वाहतुक सुरु करण्यात आली होती. तर काही कलावधीतच पाण्याची पातळी वाढुन ही सर्व वाहतुक बंद करण्यात आली होती.
अधिक वाचा :
रात्री उशीरा महामार्गावरील पाणी पातळी कमालीची वाढली होती. आज शनिवारी (दि. २४) पावसाने उसंत दिल्याने पाणी पातळी हळूहळू कमी होत आहे. सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाणी पातळी दोन फुटाने कमी झाली. पाणी पातळी कमी होण्याचा वेग कमी असल्याने रविवारी सायंकाळपर्यंत तरी रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होणार नाही, असे मत सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण भोसले यांनी दै. पुढारीशी बोलताना व्यक्त केले आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी एनडीआरएफची बोट उपलब्ध उपलब्ध केली आहे. खासदार संजय मंडलीक या बोटीतून कोल्हापूरकडे रवाना झाले. याशिवाय काही आजारी लोकांना, तर एकाचा मृतदेह कोल्हापूरतून आणण्यात आला.
दरम्यान, उदगाव येथे सांगली कोल्हापूर राज्य महामार्ग बंद झाला आहे. उदगावजवळच्या रेल्वे ओव्हरब्रिज जवळ चार फूट पाणी आल्याने सांगली कोल्हापूर वाहतुक बंद करण्यात आली आहे. या पूर्वी पुरामुळे सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारा बायपास मार्ग आधीच बंद करण्यात आला होता.
उद्या (दि. २४) सांयकाळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर महामार्गावरून पहिल्यांदा मोठे वाहन सोडून प्रात्यक्षिक घेण्यात येईल. परिस्थिती सुरक्षीत वाटल्यास अत्यावश्यक व जड वाहने सोडण्यात येतील. त्यानंतर लहान वाहने सोडण्यात येतील.
सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण भोसले