Latest
आळंदी : चिंबळीत जिलेटीनचा स्फोट घडवून चोरट्यांनी एटीएम पळविले !
आळंदी ; पुढारी वृत्तसेवा : चिंबळी (ता.खेड) येथील चिंबळी फाटा -आळंदी रस्त्यावर असलेले अँक्सिस बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून आणून चोरून नेले आहे.
रविवारी ( दि.२६) पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असून नोरुन नेलेल्या एटीएममध्ये लाखोची रक्कम असून त्याच्या निश्चित आकडा अद्याप समजू शकलेला नाही. विशेष म्हणजे रात्री पोलिसांची गस्त सदर भागात सुरू असताना पोलीस गेल्या नंतर काही वेळात हा प्रकार घडला आहे.
एटीएम रुमची अवस्था बिकट करून टाकली असून स्फोट झाल्याने या भागात बघ्यांची गर्दी उसळली.सहा महिन्यातील चिंबळी भागातील ही दुसरी घटना असून, या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावे,सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. तपास आळंदी पोलीस करत आहेत.
हेही वाचलं का?

