सांगली : माझ्यावरचा हल्ला सुनियोजीत; मंत्री जयंत पाटलांसह पोलीस अधिकारी कटात सामील : गोपीचंद पडळकर

सांगली : माझ्यावरचा हल्ला सुनियोजीत; मंत्री जयंत पाटलांसह पोलीस अधिकारी कटात सामील : गोपीचंद पडळकर
Published on
Updated on

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा

७ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्‍यावर हल्‍ला झाला. हा हल्‍ला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांचा सुनियोजित कट आहे,  असा आराेप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्‍हिडिओ व्हायरल  केला. यासंदर्भात ते म्हणाले की, हा हल्ला आटपाटी पोलीस चौकीच्या दारामध्ये झाला. व्हीडीओ चित्रीकरणात हा हल्ला किती सुनियोजीत होता हे दिसून येते. माझी गाडी ज्या दिशेने येत होती. त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडं फेकायची मग माझ्या गाडीचा वेग कमी होताच भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा आणि मग जमावाकडून हल्ला करवून घ्यायचा असा हा सुनियोजीत कट आखण्यात आला होता, असा आराेपही त्‍यंनी केला.

आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण करताना पाहायला मिळतं. हा सगळा कट पोलीसांच्या संरक्षणात घडवून आणला जातोय. आणि ती घटना थांबविण्यापेक्षा चित्रिकरण केले जात आहे. या हल्ल्याच्या कटात जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, अतिरिक्‍त पाेलिस अधीक्षक मनिषा डुबुले हे सामिल आहेत, असा आरोप पडळकर यांनी केला.

या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच निलंबित केलं. उलट माझ्यावरच ३०७ अंतर्गत गुन्हा दाखलं केला. एसपी आणि ॲडीशनल एसपी यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळे मी बॅाडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रक्षकच जर भक्षकात सामील असतील तर त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा, असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचलं का? 

व्हिडिओ पाहा : मनस्वी प्रेम करणाऱ्या त्या दोघांना शाहू महाराजांनी एकत्र आणलं | shahu maharaj and one love story

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news