

पुढारी ऑनलाईन डेस्क: अख्ख्या जगाला अमेरिकेची भुरळ पडतेय. तिथलं सुखवस्तू जीवन, झगमगाट आणि बरंच काही सोडून डॉ. गेल ऑम्व्हेट (शलाका) नावाची तरुणी भारतात येते, सत्यशोधक चळवळीचा इतिहास धुंडाळते आणि नव्याने मांडणी करते. इतकेच नाही तर इथेच एका चळवळीतील कार्यकर्त्याच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करते.
ही स्टोरी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे; पण ही वास्तवात घडलेली कहानी आहे डॉ. गेल ऑम्व्हेट यांची.
डॉ. गेल यांचे वडील आणि आजोबा हे अमेरिकन सिनेटचे मेंबर होते.
अतिशय सुखवस्तू कुटुंबातील डॉ. गेल यांनी कॅलिफोर्निया येथे पदवीचे शिक्षण घेतले. ७० च्या दशकात भारतात अभ्यासासाठी आल्या.
त्यानंतर त्यांना भारतात येण्याची उत्सुकता लागली. त्या भारतात विशेषत: महाराष्ट्रात आल्या.
त्यावेळी क्रांतीवीरांगणा इंदूताई पाटणकर यांच्या संपर्कात आल्या. त्यांनी त्यांच्यासोबत काम सुरू केले.
अमेरिकेचा झगमगाट सगळ्या जगाला भुलवत असला तरी डॉ. गेल यांनी डॉ पाटणकर यांच्याशी आणीबाणीच्या काळात लग्न केले.
त्या आयुष्यभर त्यांच्या कासेगाव येथील दगडमातीच्या घरात राहिल्या. एकीकडे श्रीमंती, झगमगाट आणि दुसरीकडे दगडमातीचा सुगंध असे जीवन त्या जगल्या.
अमेरिकेच्या डॉ. गेल ऑम्व्हेट यानंतर कासेगावच्या शलाका झाल्या.
डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी महात्मा फुले यांच्या चळवळीवरच 'वसाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड' (नॉन ब्राम्हीण मुहमेंट इन वेस्टर्न इंडिया ) या विषयावर सखोल संशोधन केले.
हा पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली विद्यापीठात सादर करून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली.
डॉ. गेल म. फुले यांच्या कार्याने प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी सत्यशोधक चळवळीचा मुळापासून अभ्यास केला. किंबहुना हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता.
या अभ्यासासाठी त्या महाराष्ट्रभर फिरल्या. त्यांनी अगदी बेळगाव, खानापूर परिसरात वास्तव्य केले. तेथील चळवळीचा अभ्यास केला.
बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम हे ऑम्व्हेट यांच्या कासेगाव येथील घरी येत असत.
राजर्षी शाहू आणि म. फुले यांची डॉ. गेल यांनी केलेली नव्याने मांडणी काशीराम यांना भावली होती.
'चळवळीतीच पाळेमुळे शोधणे, जैविकता शोधणे यामागे डॉ. गेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. मधल्या काळात म. फुले विस्मृतीत गेल्यासारखे होते. ते गेल यांच्यासारख्या संशोधकामुळे नव्याने समोर आले. त्यांनी फुले, आंबेडेकरांच्या तत्वज्ञानाची नव्याने मांडणी केली. त्यांचे मराठी अतिशय चांगले होते. त्यांनी तुकोबांचे अभंग 'सॉग्ज ऑफ तुकोबा', बेगमपुरा हे संत रविदासांवरील पुस्तक प्रकाशित केले. त्यांच्या या संशोधनामुळे नवी पायवाट तयार झाली. ती कशी? तर त्यांच्या लेखनामुळे संत साहित्याकडे पाहण्याची डाव्यांची दृष्टी त्यांनी बदलली. फार मोठे काम असूनही त्यांची दखल घेतली गेली नाही. महाराष्ट्रातील साहित्य, विचारविश्वाने त्यांच्याकडे डोळेझाक केली. डॉ. बाबासाहेबांनंतर जातीविश्वावर डॉ. आम्व्हेट यांच्याइतके इतक्या गंभीरपणे अपवादाने लिहिले असेल.'
कॉ. संपत देसाई
डॉ. भारत पाटणकर आणि डॉ. गेल ऑम्व्हेट दाम्पत्याचे आयुष्य क्रांतीकारीच म्हणावे लागेल. डॉ. पाटणकर यांनी नेहमीच धरणग्रस्तांसाठी लढा दिला आहे.
इंदूताई पाटणकर यांच्या क्रांतीकारी विचारांचा वारसा या दाम्पत्याने चालवला.
पाटणकर दाम्पत्याची मुलगी प्राची सध्या न्यूयार्क येथे असते. ती तेथेही चळवळीत सक्रीय आहे.
२६/११च्या हल्ल्यानंतर भारतीयांकडे काहीशा संशयाने पाहिले जात होत.
तेथे प्राची यांनी भारतीयांची संघटना बांधली आहे. तसेच तेथील बेघरांसाठीही त्या लढा देत आहेत.
हेही वाचलं का?