Crime News: तुलाही ड्रममध्ये भरून सिमेंट टाकीन! पत्नीच्या धमकीनंतर भयभीत पतीने उचलले टोकाचे पाऊल

पत्नीने सिमेंट आणि निळ्या ड्रममध्ये टाकून ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर पतीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

Crime News

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने सिमेंट आणि निळ्या ड्रममध्ये टाकून ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर पतीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत राहण्याची परवानगी देत लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी मेरठमध्ये मुस्कान नावाच्या महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह सिमेंटने भरलेल्या निळ्या ड्रममध्ये लपवला होता, या घटनेची पुनरावृत्ती करेल, अशी धमकी पत्नीन पतीला दिली.

Crime News
Crime News | होळीच्‍या रात्री थरार ! वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळलं; दारूच्या नशेत टोकाचं पाऊल

नेमकं प्रकरण काय?

दौलतपूर गावात राहणारा राजकुमार हा रोजंदारीवर काम करणारा मजूर असून त्याचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना सहा महिन्यांचे बाळही आहे. राजकुमारच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीचे सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले. नंतर दोघेही जवळ आले आणि गुपचूप भेटू लागले.

धमकी आणि 'निळा ड्रम' फेसबुक पोस्ट

राजकुमारने सांगितले की, गेल्या वर्षी जुलैमध्ये पत्नी माहेरी जाते असे सांगून घरातून बाहेर पडली, पण प्रत्यक्षात ती प्रियकरासोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी पत्नी फोनवर बोलत असताना राजकुमारने तिचा फोन हिसकावून घेतला. त्यात त्याला प्रियकरासोबतचे आक्षेपार्ह फोटो आणि फेसबुकवर 'सिमेंट आणि निळा ड्रम' असे कॅप्शन असलेली एक पोस्ट आढळली.

जेव्हा त्याने तिला हे संबंध थांबवण्यास सांगितले, तेव्हा तिने नकार दिला. शिवाय त्याला आणि त्याच्या भावांना 'निळ्या ड्रम' पद्धतीने मारण्याची धमकीही दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या राजकुमारने पोलिसात धाव घेतली.

सामंजस्याने सुटला प्रश्न

प्रकरण महिला समुपदेशन केंद्रात नेण्यात आले, जिथे दोन्ही पक्षांना समुपदेशनासाठी बोलावण्यात आले. या वेळी पत्नीचा प्रियकरही उपस्थित होता. तिन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली. चर्चेवेळी पत्नीने आपण प्रियकरासोबतच राहणार असल्याच सांगितले. आपल्या जीवाला धोका असल्याचे ओळखून राजकुमार आणि त्याच्या कुटुंबाने तिला प्रियकरासोबत जाऊ देण्यास संमती दिली.

Crime News
Crime News: पोटच्या दोन लेकींनीच केला बापाचा खून; एकीने पाय धरले, दुसरीने गळा चिरला; कारण ऐकून हादराल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news