Tarun Tejpal conviction : "मी ६२ वर्षांचा आहे, शिक्षेत सवलत द्या"; तरुण तेजपालची न्यायालयात विनंती

२०१३ मध्‍ये तरुण तेजपालवर महिला सहकार्‍याने केला होता लैंगिक शोषणाचा आरोप
Tarun Tejpal conviction
Tarun Tejpal conviction File Photo
Published on
Updated on

Tarun Tejpal conviction : २०१३ मधील आपल्या एका ज्युनियर महिला सहकाऱ्यावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर 'तहेलका' मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल याने आपण स्वतः "या प्रकरणात बळी ठरलो असल्याचे" न्यायालयात म्हटले आहे. तसेच त्यांनी न्यायालयाकडे शिक्षेत सवलत देण्याची विनंती केली. गोवा सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये तेजपाल यांची या प्रकरणातून मुक्तता केली होती. या निर्णयाला गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी तरुण तेजपाल यांना दोषी ठरवले.

बलात्‍कार प्रकरणी उच्‍च न्‍यायालयाने ठरवले दोषी

खंडपीठाने स्पष्ट केले की, "आम्ही सत्र न्यायालयाचा निकाल आणि आदेश रद्दबातल ठरवत तेजपाल यांना दोषी ठरवत आहोत. भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३७६(२)(फ) आणि (के), ३५४-अ आणि ३५४-ब अंतर्गत आम्ही त्यांना दोषी घोषित केले आहे."तेजपाल यांच्या शिक्षेच्या परिमाणावर न्यायालय आज पुढील सुनावणी घेणार आहे.

Tarun Tejpal conviction
Sheikh Hasina : " ते माझा जीवही घेऊ शकतात ..." : शेख हसीना डिसेंबरमध्‍ये बांगलादेशला परतणार

माझ्यावर दया दाखवा: तेजपालची

न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर तेजपाल म्हणाला, "मी ६२ वर्षांचा आहे आणि मला असे वाटते की मी स्वतः या प्रकरणात बळी ठरलो आहे. मला पत्नी आहे आणि याशिवाय सांगण्यासारखे फारसे काही नाही. मी एवढेच म्हणेन की आम्ही या निर्णयाविरोधात अपील करू शकतो. कृपया माझ्याबाबत सौम्य दृष्टिकोन बाळगावा. बाकी सर्व तथ्ये न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत."

Tarun Tejpal conviction
Shivsena Symbol Case: ब्रिटनमध्ये आठ वर्षांत सात PM, तरीही पक्षात फूट पडली नाही; शिवसेनाप्रकरणी न्यायमूर्तींचे निरीक्षण

'नाही म्हणजे नाहीच', कठोर शिक्षेची मागणी

गोवा सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले की, तेजपाल यांना पीडितेचा "नाही" हा शब्द स्वीकारता आला नाही. पीडित तरुणी ही त्यांच्या मुलीच्या वयाची होती. तेजपाल तिच्यासाठी पितृतुल्य होते, त्यांनी असे कृत्य करायला नको होते. या प्रकरणातून समाजात एक स्पष्ट आणि कठोर संदेश गेला पाहिजे. जेव्हा एखादी मुलगी 'नाही' म्हणते, तेव्हा त्याचा अर्थ 'नाही' असाच होतो. त्यामुळे न्यायालयाने तेजपाल यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी," असा युक्तिवाद मेहता यांनी केला. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी तेजपाल यांच्यावर इतर कोणताही गुन्हा दाखल आहे का, अशी विचारणा केली. त्यावर तेजपालच्या वकिलांनी सांगितले की , "माझ्या अशिलावर यापूर्वी कोणतीही एफआयआर, तक्रार किंवा गैरवर्तनाचा गुन्हा दाखल नाही,"

Tarun Tejpal conviction
Mark Zuckerberg apology : मार्क झुकरबर्ग यांनी CSAM, डीपफेक सामग्रीसह तांत्रिक चुकांबद्दल मागितली माफी

सत्र न्‍यायालयाने केली होती निर्दोष मुक्तता

नोव्हेंबर २०१३ मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि जुलै २०१४ मध्ये त्यांची जामिनावर मुक्तता झाली.तेजपाल यांच्याविरोधात २०१७ मध्ये खटल्याची सुनावणी सुरू झाली. मे २०२१ मध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी निकाल सुनावत तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती.तपासाधिकारी यांनी तपासात अनेक त्रुटी ठेवल्या तसेच फिर्यादी पक्ष (अभियोग पक्ष) सीसीटीव्ही फुटेजसह महत्त्वाचे पुरावे सादर करण्यात अपयशी ठरला, असा युक्तिवाद करत न्यायाधीशांनी त्यांना दोषमुक्त केले होते.या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला गोवा राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news