Zimbabme Cricket : झिम्बाब्वेच्या खेळाडूंना मिळते इतके मानधन

Zimbabme Cricket
Zimbabme Cricket
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. यातील काही सामन्यांमध्ये मोठ्या उलथापालथी झाल्या आहेत. आयसीसी क्रमवारीत पहिल्या आठच्या बाहेर असलेल्या संघांचा विचार केला तर झिम्बाब्वेने (Zimbabme Cricket) स्पर्धेत सर्वांना प्रभावित केले आहे. त्यांनी पहिल्या फेरीत चमकदार कामगिरी करत सुपर-१२ मध्ये प्रवेश केला. झिम्बाब्वेने आयर्लंड आणि स्कॉटलंडचा पराभव करून सुपर-१२ मध्ये स्थान मिळवले. त्यानंतर पाकिस्तानचा पराभव करत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती.

देशात आर्थिक अडचणी असतानाही झिम्बाब्वेचे (Zimbabme Cricket) खेळाडू टी-२० विश्वचषकापासून दूर राहू शकले नाहीत. आर्थिक विवंचनेसोबतच त्यांना देशातील राजकारणाचेही बळी व्हावे लागले. या सर्व समस्यांना तोंड देत त्यांनी विश्वचषक स्पर्धेमध्ये आपले स्थान निर्माण केले. सध्या विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या झिम्बाब्वे संघाचा पगार खूपच कमी आहे. झिम्बाब्वेचे वृत्तपत्र 'द स्टँडर्ड'च्या वृत्तानुसार, तेथील खेळाडूंना चार श्रेणींमध्ये स्थान देण्यात आले आहे. या चार श्रेणी X,A,B आणि C अशा आहेत.

X श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना दरमहा पाच हजार अमेरिकन डॉलर (४.११ लाख रुपये) दिले जातात. तर, श्रेणी A मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना ३५०० यूएस डॉलर्स (२.८० लाख रुपये), श्रेणी B मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना २००० डॉलर्स (१.६४ लाख रुपये) आणि तर C श्रेणीमधील खेळाडूंना १५०० डॉलर्स (१.२३ लाख रुपये) दरमहा मिळतात.

किती आहे पगार

वर्षानुसार, X श्रेणीमधील खेळाडूंना सुमारे ४९.३२ लाख रुपये मिळतात. श्रेणी A च्या खेळाडूंना सुमारे ३३.६ लाख रुपये, B श्रेणीतील खेळाडूंना १९.६८ लाख आणि C श्रेणी मधील खेळाडूंना दरवर्षी १४.७६ लाख रुपये मिळतात.

जाणून घेऊयात भारतीय खेळाडूंचा पगार

बीसीसीआयनुसार, भारतीय खेळाडूंनाही चार श्रेणींमध्ये वेतन दिले जाते. A+ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक ७ कोटी रुपये मिळतात. ग्रेड A मधील खेळाडूंना ५ कोटी, ग्रेड B मधील खेळाडूंना ३ कोटी आणि C ग्रेड मधील खेळाडूंना १ कोटी. पगार मिळतो.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news