Pune Murder Case : पुण्यात खळबळ ! वानवडीत तरुणाचा दगडाने ठेचून खून

Pune Murder Case : पुण्यात खळबळ ! वानवडीत तरुणाचा दगडाने ठेचून खून
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरात खुनाचे सत्र काही थांबण्याचे नाव घेइना. पुण्यातील वानवडी परिसरात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास, काळेपडळ संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर घडली. महादेव रघुनाथ मोरे, ( वय 25, रा. काळेपडळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान नेमका हा खून कोणत्या कारणातून करण्यात आला, हे मात्र समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तपास सुरू केला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news