

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात होणारा वन-डे वर्ल्डकप जवळ येत आहे. हा वर्ल्डकप ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये महिन्यात होणार आहे. आगामी वर्ल्डकपमध्ये तुम्ही मला नक्की पाहाल, असे भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने म्हटले आहे. भारतात होणाऱ्या वर्ल्डकपचा सलामीचा सामना ५ ऑक्टोबरला तर अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी हाेणार आहे. (World Cup 2023)
एका चाहत्यांने दिनेश कार्तिकला टॅग करत प्रश्न विचारला हाेता की, आगामी वन-डे वर्ल्डकपसाठी तुम्ही विकेटकीपरसाठी कोणते दोन पर्याय निवडाल. तुम्हाला केएल राहुल, इशान किशन आणि संजू सॅमसन पैकी दोघांची निवड करावी लागेल. दिनेश कार्तिकने उत्तर दिले की, "मी एवढेच सांगू शकतो की, तुम्ही मला वर्ल्डकपमध्ये नक्कीच पाहाल" (World Cup 2023)
दिनेश कार्तिकने म्हटलं आहे की, आगामी वर्ल्डकपमध्ये मी एक वेगळी कामगिरी करताना तुम्हाला दिसणार आहे. या वर्ल्डकपमध्ये मी कॉमेंट्री करणार असल्याचे त्याने सांगितले. सध्या दिनेश कार्तिक कॉमेंट्रीमुळे खूप चर्चेत आहे. त्यामुळे दिनेश वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच कॉमेंट्री करताना आपल्याला दिसणार आहे. याआधी त्याने दोनदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कॉमेंट्री केली आहे. दिनेश सध्या इंग्लंडमध्ये 'द हंड्रेड'मध्ये कॉमेंट्री करत आहे.
हेही वाचा;