Stock Market Closing Bell | सेन्सेक्स निचांकावरून ५५० अंकांनी सावरला, जाणून घ्या बाजारात नेमकं काय घडलं? | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स निचांकावरून ५५० अंकांनी सावरला, जाणून घ्या बाजारात नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : आरबीआयच्या उद्या जाहीर होणाऱ्या पतधोरण निर्णयापूर्वी शेअर बाजारात आज बुधवारी चढ-उतार दिसून आला. सुरुवातीला ३५० अंकांनी घसरलेला सेन्सेक्स बाजार बंद होताना सावरला. सेन्सेक्स १४९ अंकांनी वाढून ६५,९९५ वर बंद झाला. तर निफ्टी ६१ अंकांच्या वाढीसह १९,६३२ वर स्थिरावला. विशेष म्हणजे आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स दिवसाच्या निचांकीवरून सेन्सेक्स ५५० अंकांनी सावरला.

बँकिंग आणि रियल्टी स्टॉक्समध्ये विक्री दिसून झाली. (Stock Market Closing Bell) क्षेत्रीय पातळीवर मेटल निर्देशांक २.५ टक्के तसेच ऑईल आणि गॅस निर्देशांक १ टक्के वाढला. एफएमसीजी, कॅपिटल गुड्स आणि हेल्थकेअर ०.५ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.४ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वधारला.

‘हे’ शेअर्स वधारले

सेन्सेक्स आज ६५,८१० वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,४४४ पर्यंत खाली आला. पण तो आज ६६ हजारांजवळ जाऊन बंद झाला. सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील हा शेअर टॉप गेनर होता. हा शेअर ३ टक्के वाढून ८२६ रुपयांवर पोहोचला. टाटा मोटर्स, एम अँड एम, टेक महिंद्रा, टाटा स्टील, आयटीसी, टायटन, रिलायन्स हे शेअर्स वाढले. तर बजाज फायनान्स, मारुती, अल्ट्राटेक, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स हे शेअर्स काही प्रमाणात घसरले.

अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीकडे आणि आरबीआयच्या गुरुवारी होणाऱ्या धोरणात्मक निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात चढ-उतार दिसून आला.

आशियाई बाजारात सुस्त स्थिती

अमेरिकेतील शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात गुंतवणूकदारांची सावध भूमिका दिसून आली. जपानचा निक्केई निर्देशांक ०.५३ टक्क्यांनी म्हणजेच १७२ अंकांनी घसरून ३२,२०४ अंकांवर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक ०.४० टक्क्यांनी घसरून २,२८२ वर स्थिरावला. हाँगकाँगचा हँगसेंग सुरुवातीला घसरला आणि त्यानंतर तो सावरून ०.२ टक्क्यांनी वाढला.

अमेरिकेची अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त

पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि बँकांच्या स्थितीविषयी पुन्हा एकदा चिंता निर्माण केली आहे. याचे पडसाद अमेरिकेतील शेअर बाजारात उमटले. या डाउनग्रेडनंतर येथील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) ०.५ टक्क्यांनी घसरला. S&P 500 निर्देशांक ०.४ टक्क्यांनी आणि नॅस्डॅक कंपोझिट (Nasdaq Composite) ०.८ टक्क्यांनी घसरला.

परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग आठव्या सत्रांत विक्री

सलग आठव्या सत्रांत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) भारतीय बाजारात विक्री राहिली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या ( National Stock Exchange) आकडेवारीनुसार, काल मंगळवारी एका दिवशी परदेशी गुंतवणूकदारांनी ७११ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गंत गुंतवणूकदारांनी (DIIs) ५३७ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

हे ही वाचा :

Back to top button