

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशाच्या नवीन राष्ट्रपती पदासाठी पुढील महिन्यातील मंगळवारी (दि. १८ जुलै) रोजी निवडणूक असल्याने सध्या सर्वाचे लक्ष राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांवर लागले आहे. याच दरम्यान माजी अर्थमंत्री आणि टीएमसीचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असू शकतील असे बोलले जात आहे. तर विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असल्याने नेमकी राष्ट्रपती पदासाठी कोणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते शरद पवार, फारुख अब्दुल्ला आणि गोपाळ कृष्ण गांधी यांनी विरोधकांचा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. याच दरम्यान यशवंत सिन्हा यांनी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांनी एक ट्विट केलं आहे. यात सिन्हा यांनी ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये जो सन्मान आणि प्रतिष्ठा दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तर आता वेळ आली आहे की, पक्ष सोडून विरोधी ऐक्यासाठी काम केले पाहिजे. हा माझा निर्णय पक्षाला मान्य असेल असे म्हटले आहे.
यशवंत सिन्हा आज मंगळवारी (दि. २१) रोजी दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विरोधी पक्ष तृणमूल काँग्रेसकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. पत्रात नव्याने आलेल्या उमेदवारांला संधी देण्यासाठी आणि पक्षाला बळ देण्यासाठीच यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाची वर्णी लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
याच दरम्यान महात्मा गांधी यांचे नातू गोपाळ कृष्ण गांधी यांनी राष्ट्रपतीपदासाठी आपले नाव सुचवल्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांचे आभार मानले असून त्यांनी निवडणूक न लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यशवंत सिन्हा हे एक चांगले उमेदवार असून भविष्यात ते योग्य काम करतील अशी अशा व्यक्त केली आहे.
हेही वाचलंत का?