आम्ही आमचे निर्दोषत्व सिद्ध करण्यास तयार आहोत, पण जी काही चाचणी होईल, ती सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील व्हावी आणि तिचे राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर जिवंत प्रसारण व्हावे, असे बजरंग पुनिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. चाचणीत कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार, हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर धरणे आंदोलन चालविलेले आहे.