world’s longest river cruise: जगातील सर्वात लांब नदी यात्रा घडविणाऱ्या गंगा विलास क्रूझचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

world’s longest river cruise: जगातील सर्वात लांब नदी यात्रा घडविणाऱ्या गंगा विलास क्रूझचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जगातील सर्वात लांब जलमार्गावरील MV गंगा विलास क्रूझचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.१३) सकाळी लोकार्पण करण्यात आले. याचबरोबर वाराणसीमधील टेंट सिटीचेही व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उद्धघाटन करण्यात आले. जगातील सर्वात लांब आणि २७ नद्यांची सफर घडवत वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना भेट देत जाणार्‍या 'एमव्ही गंगा' या लक्झरी क्रूझची सफर शुक्रवारपासून सुरू होत आहे. वाराणसी ते दिब्रुगड (व्हाया बांगला देश) असा ५१ दिवसांचा हा लक्झरियस प्रवास असणार आहे.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री एस सोनोवाल, यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ लॉन्च इव्हेंटमध्ये उपस्थित आहेत. बिहारचे डीसीएम तेजस्वी यादव आणि आसामचे मुख्यमंत्री एचबी सरमा या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते.

भारतातील पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या नाविण्यपूर्ण क्रूझवर आवश्यक सुविधा, विशेष जेवणाची सोय, सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ही क्रूझ बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगला देशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी या प्रमुख शहरांमधून जाणार आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news