World Milk Day: ‘पोषण आणि उपजीविका’; यंदाच्या ‘दूध दिना’ची थीम

World Milk Day: ‘पोषण आणि उपजीविका’; यंदाच्या ‘दूध दिना’ची थीम
Published on
Updated on

जागतिक दूध दिन सन २००१ पासून साजरा (World Milk Day) करण्यात येतो. दुधाचा प्रचार, प्रसार अधिकाधिक प्रमाणात होण्यासाठी हा दिन साजरा करण्यात येतो. यंदा म्हणजे २०२३ साठी दूध दिनाची थीम ही 'पोषण आणि उपजीविका'अशी आहे.

हल्लीच्या काळात दुधात तसेच दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. पूर्वी शहरापुरतेच असणारे हे भेसळीचे प्रकार हल्ली ग्रामीण भागातही पोहोचले आहेत. पूर्ण अन्न, आरोग्यदायी दूध अशी व्याख्या आता विषारी दुधाकडे होऊ लागली आहे. अशा भीषण, भयंकर परिस्थितीतीमध्ये शुद्ध, स्वच्छ, निर्भेळ दूध दिन (World Milk Day) साजरा होणे गरजेचे झाले आहे.

घरातील अर्भकापासून ते ज्येष्ठांपर्यंत अशा सर्वांचे पूर्णान्न म्हणून दुधाकडे पाहिले जाते. आपल्या सर्वांच्या उत्तम, सुदृढ आरोग्यासाठी दुधाचे महत्त्व खूप आहे. दुधामध्ये आरोग्यदायी असे अनेक प्रथिने, पौष्टिक घटकद्रव्ये असतात. यामुळे जे जशी आपली भूक भागवते. तसेच ते अनेक व्याधींवर गुणकारीही असते. जसे की अवेळी अ़न्न सेवन केल्याने म्हणा किंवा जागरणामुळे म्हणा जेव्हा पोटामध्ये पित्त होते, जळजळ होते. त्यावर त्वरित उपाय म्हणून दूध फार उपयुक्त ठरू शकते.

तसेच दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असल्यामुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया सुधारू शकते. दूध दात, केस, हाडे, स्नायू यांची गुणवत्ता वाढवते. यामुळे शरीर मजबूत होऊन रोगांशी प्रतिकार करण्याची क्षमता वाढविते. यानिमित्ताने आपल्या सर्वांच्या हे लक्षात येईल की, दुधाचे आपल्या रोजच्या आहारमध्ये किती महत्त्वाचे स्थान आहे ते.

World Milk Day : दूधाविषयी जागृती वाढवावी

दुधाविषयी जागरूकता वाढविणे, उत्तम आरोग्य आणि पोषणामध्ये दुधाचे मूल्य वाढवणे, दूध उत्पादनाविषयी जनजागृती करणे, शुद्ध, स्वच्छ, निर्भेळ दूध सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा संदेश या जागतिक दूध दिनाच्या निमित्ताने आपण एकमेकांना देऊयात.

पृथ्वीवरचे अमृत जर काय असेल तर दूध. अर्भकापासून ज्येष्ठांपर्यंतचे पूर्ण अन्न जर काय असू शकेल ते म्हणजे दूध. विविध आजारांवर जर त्वरित उपचार काय असू शकेल तर ते म्हणजे दूध. अशी या दुधाची महती आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news