

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देणारे ऐतिहासिक "नारीशक्ती वंदन अधिनियम" हे १२८ वी घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले आहे. नव्या संसदेत लोकसभेची मंजुरी मिळविणारे हे पहिले विधेयक ठरले होते. दरम्यान, आता या विधेयक आता राज्यसभेतही मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने २१५ खासदारांनी मतदान केले असून विरोधात एकही मत पडलेले नाही. (Women's Reservation Bill)
राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभेचे सभेचे सभापती जगदीप धनकड यांनी पीएम मोदींना वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदू पंरेपरेनुसार आज पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आहे. हा आनंदाचा योग आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे धनकड राज्यसभेच्या कामाकाजावेळी बोलताना म्हणाले.
महिला आरक्षण विधेयक देशातील नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करेल. महिलांना सशक्त करणाऱ्या या विधेयकाला मंजूर करताना सर्व राजकीय पक्षांनी आणि सर्व सदस्यांनी महत्वाची भूमिका बजावली. देशात चांगला मेसेज पोहोचवूयात, असे पीएम मोदी मतदान करण्यापूर्वी म्हणाले आहेत.