File Photo
File Photo

Winter Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवार दि. ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरु होणार असून अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या कामकाजावर आज (दि.२९) मुंबईत विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असले, तरी ते नेमके कधी सुरु होणार? याबद्दल संभ्रम होता. अखेर आज हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली. विधीमंडळाचे ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार आहे. नागपुरात १९२१ साली स्थापन झालेल्या विधान परिषद सभागृहाला १०० वर्षे पूर्ण झाली असल्याने यावर्षी हिवाळी अधिवेशनात ८ डिसेंबर रोजी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विदर्भात अधिवेशन होत असल्यामुळे जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अधिवेशन काळात मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय चर्चा होणार आहे. ती नेमकी कधी होईल याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी सांगितले होते.

सरकार अधिवेशनाबाबत गंभीर नाही : वडेट्टीवार

मुंबई येथे माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, ३ आठवड्याच्या अधिवेशनाची आमची मागणी होती. मात्र सरकारने ३ आठवड्याऐवजी २ आठवड्याचे अधिवेशन ठेवले. अधिवेशनाबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या अटकेबाबत बोलताना त्यांनी अशा प्रकारची अटक योग्य नसल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news