White Deer : चंद्रपुरात दुर्मिळ पांढरी हरणे आढळली; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

file photo
file photo
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा आपण आतापर्यंत तपकिरी ठिपके असलेले हरीण (White Deer) बघितले आहे. पण आता पांढऱ्या रंगाचेही हरिण पाहायला मिळाले तर आपणाला आश्चर्य वाटायला नको. होय कारण चंद्रपूर जिल्ह्यात आता पांढऱ्या रंगाचेही हरीण पाह्याला मिळणार आहेत. देशात अतिशय दुर्मिळ असलेले पांढऱ्या रंगाची 3 हरणे (2 मोठे, एक लहान) चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णाच्या (केमारा देवई) पोंभुर्णा वनपरीक्षेत्रात नुकतेच आढळून आले आहेत.

बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते पवन भगत आणि बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय कळसकर हे केमारा देवई (पोंभुर्णा) गावावरून कौटुंबिक कार्यक्रम आटोपून सहपरिवार परत येत असतांना त्यांना केमारा देवई (पोंभुर्णा) वनक्षेत्रात पांढऱ्या रंगाची अतिशय दुर्मीळ 3 हरणे (White Deer) आढळून आली. त्यांनी लगेच हे दृश्य आपल्‍या कॅमेरात कैद केली. याची माहिती त्‍यानी सोशल मीडियावर शेअर केली. पांढऱ्या हरणांविषयी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

भारतात या पूर्वी काझीरंगा आसाम येथे अश्याच प्रकारचे दुर्मिळ हरीण (White Deer) आढळून आले. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी ताडोबा अभयारण्यात काळ्या रंगाचा दुर्मिळ बिबट देखील आढळून आला होता. त्याचे दर्शन पर्यटकाना होत आहे. नुकतेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ताडोबात सफारी केली. यावेळी त्यांना काळा बिबट्याचे दर्शन झाले आहे. दुर्मीळ वन्यप्राण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांकडून चांगलीच पसंती आहे. त्यामुळे पर्यटकांत पांढऱ्या हरणांना पाहण्यासाठी कमालीची उत्सुकता वाढली आहे.

पांढऱ्या हरणांना पाहण्याची उत्सुकता

पोंभुर्णा वनपरिक्षेत्र 7 हजार एकरमध्ये विस्तारलेला आहे. 8 महिन्यांपासून येथे आम्‍ही कार्यरत आहोत. वाघ, बिबट, नीलगाय, हरीण, रानगवे असे अनेक प्राणी या वनक्षेत्रात बघितले, पण पांढरे हरीण (White Deer) बघितले नाही. परंतु नुकतेच पांढरे हरीण काही जणांना पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या हरनांणा पाहण्याची उत्सुकता आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार (पोंभुर्णा) व कोठारी येथील वनअधिकारी मुरकुटे यांनी दिली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news