‘पठाण’चे सीन्स पाहताच सलमानचा थेट शाहरुखला फोन, म्हणाला…

‘पठाण’चे सीन्स पाहताच सलमानचा थेट शाहरुखला फोन, म्हणाला…
Published on
Updated on

पुढारी ऑलनाईन डेस्क : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान स्पेनमध्ये असून आगामी 'पठाण' (Pathan ) चित्रपटाचे शूटिंगमध्ये बिझी आहे. बऱ्याच काळानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याने चाहत्यासह अनेक कलाकार उत्सुक आहेत. याच दरम्यान पठाण चित्रपटातील काही फोटो आणि सीन्स व्हायरल होत आहेत. यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमानने चित्रपटातील सीन पाहताच थेट शाहरुखला फोन करून चित्रपट सुपरडूपर हिट होणार असल्याचे त्याने आश्वासन दिले आहे.

शाहरुख खान त्याच्या सहकलाकारांसह पठाण (Pathan ) चित्रपटाचे शूटिंग करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत शाहरुख शर्टलेस असून त्याने हिरव्या रंगाच्या पॅन्ट परिधान केली आहे. याशिवाय त्याचा लांब केसातील लूक खूपच हॉट दिसत आहे. फोटोमध्‍ये शाहरूख ऐब्स फ्लॉन्ट करताना देखील दिसला.

व्हायरल झालेल्या एका फोटोत लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण एका ठिकाणी बसलेली दिसत आहे. पठाण चित्रपटात सलमानने एक कॅमिओ रोल केला आहे. सलमान आणि शाहरुखची खूपच जुनी मैत्री आहे. शाहरुख बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याने सलमानसह सर्व चाहते खूपच उत्साहित आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, सलमानने नुकताच पठाण चित्रपटातील २० मिनिटांचा सीन पाहिला आहे. हा सीन पाहिल्यानंतर सलमानला राहवलं गेलं नाही तर त्याने थेट शाहरुखला फोन करून आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी दोघांनी बराच वेळ एकमेकांशी संवाद साधला. या संवादात सलमानने पठाण चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार असून तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही, असे आश्वासन दिले आहे. तर हा चित्रपट सुपरडुपर हिट होणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे कलाकार सध्या स्पेनमधील मॅलोर्का येथे असून चित्रपटातील गाण्यांचे शूटिंग करत आहेत. शाहरुख खानच्या या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन सीन पाहायला मिळणार आहे.

शाहरुख आणि सलमान बऱ्याच काळानंतर रुपेरी पडद्यावर एकत्रित दिसणार असल्याने चाहते खूपच उत्साहित आहेत. यापुर्वी दोघांनी 'करण अर्जुन', 'कुछ कुछ होता है' आणि 'हम तुम्हारे है सनम' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्रित काम केले आहे. यामुळे पठाण चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news